Dhanshri Shintre
आंब्यात व्हिटॅमिन ए, सी आणि अँटीऑक्सिडेंट्स भरपूर असतात. हे शरीरात ऊर्जा वाढवते आणि पचन सुधारण्यास मदत करतात.
उन्हाळ्यात दही खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि पचन प्रणाली निरोगी राहते.
काही लोकांना असा विश्वास आहे की आंबा आणि दही एकत्र खाल्ल्याने पोटदुखी आणि वेदना होऊ शकतात.
आयुर्वेदानुसार, आंबा गरम आणि दही थंड असल्याने, हे दोन्ही एकत्र खाणे काही लोकांसाठी योग्य नाही.
पचनक्षमता कमजोर असल्यास, आंबा आणि दही एकत्र खाल्ल्याने गॅस, ॲसिडिटी आणि पोटातील अन्य समस्या होऊ शकतात.
लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींना आंबा आणि दही एकत्र देणे टाळा, कारण त्यांची पचनक्रिया कमजोर असते.
आंबा आणि दही एकत्र खाल्ल्यास, ताजे आणि साधे दही वापरा; गोड आणि अत्यधिक थंड दही टाळा.