Liver Health: लिवर निरोगी ठेवायचंय? 'हे' पदार्थ आहारात समाविष्ट करा आणि आजार टाळा

Dhanshri Shintre

ऊर्जा साठण्याचे काम

लिवर शरीरातील एक महत्त्वाचा अवयव असून, रक्त शुद्धीकरण, अन्न पचन, विषारी घटक बाहेर टाकणे आणि ऊर्जा साठवण्याचे काम करते.

उपयुक्त अन्नपदार्थ

लिवर अनेक महत्त्वाची कामे करतो, त्यामुळे त्याची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. लिवरसाठी उपयुक्त अन्नपदार्थ कोणते, ते जाणून घ्या.

हळद

हळदीतील कर्क्यूमिन हा प्रभावी अँटी-ऑक्सिडंट असून, तो यकृत डिटॉक्स करण्यात मदत करतो आणि यकृताच्या पेशींना नुकसानापासून सुरक्षित ठेवतो.

लसूण

लसूणमध्ये असलेली सल्फर संयुगे यकृत डिटॉक्स करणाऱ्या एंजाइमना सक्रिय करतात आणि चरबीचे चयापचय सुधारून यकृतात चरबी साचण्यापासून संरक्षण करतात.

ग्रीन टी

ग्रीन टीमध्ये असलेले कॅटेचिन अँटीऑक्सिडंट्स यकृताचे कार्य सुधारतात, सूज कमी करतात आणि फॅटी लिव्हर टाळण्यासाठी उपयुक्त ठरतात, त्यामुळे नियमित सेवन फायदेशीर ठरते.

बीट

बीटमध्ये असलेले नायट्रेट्स आणि अँटीऑक्सिडंट्स यकृत डिटॉक्ससाठी फायदेशीर असतात. ते रक्तप्रवाह सुधारतात आणि पित्तस्रव वाढवून पचनक्रियेस मदत करतात.

एवोकॅडो

एवोकॅडोमध्ये असलेले ग्लूटाथिओन हे अँटीऑक्सिडंट यकृतातील विषारी घटक दूर करण्यास मदत करते, सूज कमी करते आणि यकृताच्या पेशींची दुरुस्ती करते.

NEXT: फणस कोणत्या देशाचे राष्ट्रीय फळ आहे? तुम्हाला माहित आहे का?

येथे क्लिक करा