एकादशीच्या दिवशी तांदूळ का खाऊ नये?

Surabhi Jayashree Jagdish

एकादशी

एकादशी हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र उपवासाचा दिवस मानला जातो. या दिवशी शरीर, मन आणि आत्मशुद्धीला महत्त्व दिलं जातं. म्हणूनच एकादशीला काही पदार्थ वर्ज्य मानले जातात, त्यात तांदूळ प्रमुख आहे.

तांदूळ

तांदूळ न खाण्यामागे धार्मिक, पौराणिक तसंच आयुर्वेदिक कारणं सांगितली जातात. या परंपरेमागचा अर्थ समजून घेतला तर तिचं महत्त्व अधिक स्पष्ट होतं.

पौराणिक कथा

पद्मपुराणानुसार एकादशीच्या दिवशी पापपुरुष अन्नामध्ये वास करतो. भगवान विष्णूंनी त्याला तांदळात राहण्याची जागा दिली असे सांगितले जाते. म्हणून एकादशीला तांदूळ खाल्ल्यास पाप लागते अशी श्रद्धा आहे.

विष्णू पूजेशी थेट संबंध

एकादशी हा भगवान विष्णूंना समर्पित दिवस आहे. या दिवशी सात्त्विक व हलका आहार घेण्याचा नियम सांगितला आहे. तांदूळ राजस मानला जात असल्याने तो टाळला जातो.

अजून एक कथा

पौराणिक कथेनुसार महर्षि मेधा यांनी मातृशक्तीच्या क्रोधापासून वाचण्यासाठी शरीराचा त्याग केल्यानंतर त्यांच्या शरीराचा एक भाग पृथ्वीगर्भात पडला. ज्या दिवशी महर्षींचे शरीर पृथ्वीत लीन झाले होते, त्या दिवशी एकादशी होती, अशी मान्यता आहे.

महर्षी मेधा

महर्षी मेधा यांनी पृथ्वीवर तांदूळ आणि बार्लीच्या रूपात जन्म घेतल्याचं म्हटलं जातं. तेव्हापासून तांदूळ आणि बार्ली यांच्यात जीव आहे अशी मान्यता आहे.

आयुर्वेदिक कारण

एकादशीला शरीराची पचनशक्ती मंद असते असे आयुर्वेद सांगतो. तांदूळ जड व कफ वाढवणारा मानला जातो. म्हणून उपवासात तांदूळ वर्ज्य केला जातो.

धार्मिक शुद्धतेचा नियम

धर्मशास्त्रांनुसार एकादशीला धान्य सेवन निषिद्ध आहे. तांदूळ हे धान्य वर्गात मोडते. म्हणून साबुदाणा, बटाटा, फळं यांचा वापर केला जातो.

शारीरिक व मानसिक शुद्धी

तांदूळ टाळल्याने शरीर हलके राहते असा अनुभव सांगितला जातो. मन शांत राहून जप, नामस्मरण चांगल्या प्रकारे होते. म्हणून एकादशीला तांदूळ न खाण्याची परंपरा टिकून आहे.

Spicy curry chutney: जेवताना तोंडी लावायला काहीतरी हवंय? मग १० मिनिटात बनवा ही झणझणीत कडीपत्त्याची चटणी

येथे क्लिक करा