ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिंदू धर्मात श्रावण या महिन्याला विशेष असे महत्त्व आहे.
श्रावण महिन्यात विशेष असे हिरव्या रंगालाही महत्त्व प्राप्त होत असते.
तुम्हाला माहिती आहे का? श्रावण महिन्यात हिरव्या बांगड्या का घालतात?
श्रावण महिन्यात महिलांनी हिरव्या बांगड्या घालणे अत्यंत चांगले समजले जाते.
असे मानले जाते की श्रावण महिन्यात हिरव्या बांगड्या घातल्याने देवी पार्वती प्रसन्न होते.
शास्त्रानुसार, श्रावणात विवाहित महिलांनी हिरव्या बांगड्या घातल्याने त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी होते.
हिरवा रंग कायम समृद्धीचे प्रतीक मानला जातो त्यामुळे श्रावण महिन्यात हिरव्या रंगाचे कपडे किंवा महिला बांगड्या घालतात.
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.