ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
श्रावण महिन्यात महिला त्यांच्या सुखी वैवाहिक आयुष्यासाठी आणि पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी सोमवार आणि मंगळागौरी व्रत करतात.
श्रावण महिन्यात महादेव आणि माता पार्वती यांची पूजा आणि व्रत केले जाते.
तुमच्या आयुष्यातील समस्या दूर करण्यासाठी सुवासिनींनी श्रावण महिन्यात या गोष्टी नक्की करा.
दररोज सकाळी स्वच्छ स्नान केल्यावर शिवलिंगावर पाणी अर्पण करा.
महादेवाची आणि माता पार्वतीची पूजा करताना महिलांनी हिरव्या बांगड्या आणि शृंगार करावा यामुळे माता पार्वती प्रस्न्न होते.
श्रावणात महिलांनी शृंगाराचे सामान दान करावे यामुळे तुमच्यावर माता पार्वती आणि महादेवाची कृपा दृष्टी रहाते.
श्रावण महिण्यात मेहंदी लावावी यामुळे तुमच्या वैवाहिक जीवणामध्ये चांगले प्रसंग येण्याची शक्यता आहे.
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.