ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपण अनेकदा पाहिल असेल की शाळेच्या बसेसचा रंग पिवळा असतो. पण यामागचं कारण काय. जाणून घ्या.
पिवळा रंग लांबूनही सहज दिसतो.
धुकं असली किंवा पाऊस असला तरी पिवळ रंग स्पष्ट दिसतो.
वैज्ञानिकांच्या मते, पिवळ्या रंगाचा लॅटरल पेरिफेरल विझन (Lateral Peripheral Vision) जास्त आहे.
पिवळा रंग हा बाकी रंगाच्या तुलनेत जास्त उठून दिसतो. त्यामुळे पिवळा रंग सहसा आपले लक्ष वेधून घेतो.
इतर रंगाच्या तुलनेत पिवळा रंग 1.24 पटींनी जास्त आकर्षक आहे.
हा रंग स्पष्ट दिसत असल्याने अपघात होण्याची शक्यता कमी आहे. म्हणून मुलांच्या सेफ्टीसाठी बसचा रंग पिवळा असतो.
तसेच रस्त्याच्या कडेला लावलेल्या काही सांकेतिक बोर्डाचा रंग पिवळा असतात.