ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जर तुम्हालाही तुमच्या मुलांसाठी काही टेस्टी आणि हेल्दी खायला द्यायच असेल तर तुम्ही घरच्या घरी मिक्स फ्रुट जॅम बनवू शकता. रेसीपी नोट करा.
२ केळी, २ सफरचंद, १ अननस, ६ स्ट्रॅाबेरी, ४ बिया नसलेली द्राक्ष,२ संत्री, मनुके, साखर आणि लिंबाचा रस.
सर्वप्रथम एका भांड्यात सर्व फळे कापून त्यात १/4 पाणी घाला आणि मंद आचेवर १० मिनिटे शिजवून घ्या.
फळं शिजल्यानंतर एका बाउलमध्ये काढून थंड करुन घ्या. आणि मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करुन घ्या.
एका पॅनमध्ये साखर आणि तयार केलली पेस्ट मंद आचेवर शिजवून घ्या. उकळ येईपर्यंत मिश्रण ढवळत राहा.
हे मिश्रण हळूहळू घट्ट होऊ लागल्यानंतर यामध्ये लिंबाचा रस घाला आणि मिश्रण व्यवस्थित मिक्स करुन घ्या.
जॅम पूर्णपणे घट्ट होईपर्यंत शिजवा. मिश्रण जॅमच्या स्वरुपात आल्यावर गॅस बंद करा.
मिक्स फ्रुट जॅम तयार आहे. जॅम थंड झाल्यावर तुम्ही याला हवेबंद बरणीमध्ये पॅक करुन ठेवू शकता.