Manasvi Choudhary
हिंदू धर्मात, लग्नानंतर अनेक प्रथा पद्धती केल्या जातात. त्यापैकी एक परंपरा म्हणजे सत्यनारायणाची पूजा. लग्नानंतर सत्यनारायणाची पूजा घातली जाते.
आजही अनेकजण लग्नात सत्यनारायणाची पूजा घालतात. मात्र ही पूजा घालण्यामागचे नेमके कारण काय आहे? हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
लग्नानंतर नववधू आणि वर हे नवीन आयुष्याची सुरूवात करत असतात यामुळे लग्नानंतर सत्यनारायणाची पूजा घालतात असा यामागचा मुख्य हेतू आहे.
लग्नानंतर पती-पत्नी एकमेकांचे जीवनसाथी झालेले असतात. यावेळी जीवनाची सुरूवात देवाच्या साक्षीने व्हावी यासाठी दोघांचाही पहिला धार्मिक सोहळा म्हणून घरामध्ये सत्यनारायणी पूजा घातली जाते.
अनेक ठिकाणी तर सत्यनारायण पूजा झाल्याशिवाय नववधू - वर यांना एकत्र येऊ दिले जात नाही अशी देखील प्रथा आहे.
लग्नानंतर कुलदैवत कुलदेवीचे दर्शन घेऊन संसाराची शुभ सुरुवात करण्यासाठी सत्यनारायण पूजा घातली जाते.
सत्यनारायणाची कथा ऐकल्यामुळे मनाला शांती मिळते. कथेतील संदेशांमधून दानधर्म करणे, अहंकार सोडून देणे आणि भक्तीभावाने जगणे याचे महत्त्व समजते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.