Surabhi Jayashree Jagdish
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यासाठी प्रचार आता थांबवण्यात आला आहे. मतदानाच्या आधीचा हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. त्यामुळे सर्व पक्षांनी आता मतदानावर लक्ष केंद्रित केलं आहे.
प्रचारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीम दौऱ्यावर गेलेत. ते दोन दिवसांच्या भेटीसाठी सिक्कीममध्ये पोहोचले आहेत. या दौऱ्याला राजकीय दृष्टिकोनातूनही महत्त्व दिलं जात आहे.
मंगळवारी सकाळी गंगटोकमध्ये पंतप्रधान मोदी मुलांसोबत दिसून आले. त्यांनी मुलांशी संवाद साधला.
पंतप्रधानन मोदी सकाळीच फुटबॉलच्या मैदानात उतरले होते. यावेळी त्यांनी तरूणांसोबत संवाद साधला आणि आणि युवकांसोबत खेळाचा आनंद लुटला.
फुटबॉल खेळतानाचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले. त्यांनी गंगटोकच्या सुंदर सकाळचा उल्लेख करत आनंद व्यक्त केला.
या कृतीकडे पश्चिम बंगालशी जोडलेल्या रणनीतीच्या दृष्टीने पाहिलं जातंय. बंगालमध्ये फुटबॉल अत्यंत लोकप्रिय खेळ आहे. त्यामुळे हा संदेश अप्रत्यक्षपणे बंगालमधील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मानला जातो.
पश्चिम बंगालमध्ये फुटबॉलचा प्रभाव खूप मोठा आहे. वर्ल्डकपसारख्या स्पर्धांदरम्यान तिथे प्रचंड उत्साह दिसतो. त्यामुळे मोदींचा फुटबॉल खेळण्याचा निर्णय हा त्या लोकप्रियतेचा फायदा घेण्याचा भाग मानला जातोय.