ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकावर म्हणजेच डिव्हयडरवर विविध प्रकारची झाडे लावलेली असतात हे तुम्ही अनेकदा पाहिले असेल.
परंतु तुम्हाला माहित आहे का, डिव्हायडरवर झाडे का लावली जातात, जाणून घ्या.
वाढत्या वाहनांमुळे शहरांमध्ये प्रदूषण ही मोठी समस्या बनली आहे. डिव्हायडरवर लावलेली झाडे प्रदूषण कमी करण्याचे काम करतात.
शहरांमध्ये, वाहनांच्या हॉर्न आणि इंजिनच्या आवाजामुळे जवळपास राहणाऱ्या लोकांना त्रास होतो. ही झाडे नैसर्गिकरित्या साउंड बॅरिअर म्हणून काम करतात.
सुंदर रोपे ररत्यावरचे सौंदर्य वाढण्याचे काम करण्यासह डिव्हायडरला हायलाइट करण्याचे काम करतात. यामुळे अपघात होण्याचा धोका कमी होतो.
या झाडांमधून पावसाचे पाणी जमीनीत शिरावे म्हणून डिव्हायडरच्यामध्ये असलेली माती कच्ची ठेवली जाते.
ही झाडे ग्राउंड वॉटर लेव्हल राखण्यात महत्वाची भूमिका बजावतात.