ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिंदू धर्मात झाडूला खूप महत्व आहे. झाडूमध्ये माता लक्ष्मीमध्ये वास करते, असं मानलं जातं.
वास्तुशास्त्रामध्ये, घरामध्ये झाडू नेहमी योग्य दिशेला ठेवण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे सकारात्मक उर्जा वाढते.
अनेकजण झाडूला स्वयंपाकघरात ठेवतात. परंतु, तुम्हाला माहीत आहे का, झाडू स्वयंपाक घरात ठेवणं, शुभ की अशुभ, जाणून घ्या.
स्वयंपाकघरात झाडू ठेवू नये, याला अशुभ मानले जाते. यामुळे तुमच्या जीवनात नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
स्वयंपाकघरात झाडू ठेवल्याने अनेक समस्या उद्बवू शकतात. म्हणून स्वयंपाकघरात विशेषतः गॅसजवळ झाडू ठेवू नये.
वास्तशास्त्रानुसार, घर आणि स्वयंपाकघराची स्वच्छता महत्वाची असते. जे घराच्या उर्जेवर परिणाम करु शकतात.
वास्तुशास्त्रानुसार, झाडू ठेवण्यासाठी दक्षिण आणि पश्चिम दिशा सर्वोत्तम मानली जाते.