ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कडाक्याच्या उन्हात मुलांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. चांगल्या आरोग्यासाठी त्यांना आहारात हेल्दी पदार्थ द्या.
रखरखत्या उन्हात मुलांना आहारात कोणते पदार्थ दिले पाहिजेत, जाणून घ्या.
मुलांच्या आहारात, पपई, कलिंगड, पेरु आणि आंबा सारख्या फलांचा समाववेश करा. यामध्ये व्हिटॅमिन्स, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळतात.
ही फळं मुलांच्या शरीरातील पाण्याची कमतरता भरुन काढतात.तसेच शरीराला थंडावा देतात.
दही शरीराला थंडावा देण्यासह रोगप्रतिकारशक्ती देखील मजबूत करते. मुलांना लस्सी किंवा रायता द्या.
मुलांच्या आहारात ताज्या भाज्यांचा समावेश करा. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे डाळ आणि पनीरचा देखील समावेश करा.
कडाक्याच्या उन्हात शरीराला थंडावा आणि उर्जा मिळावी यासाठी त्यांना नारळ पाणी किंवा लिंबू पाणी द्या.