Manasvi Choudhary
सोशल मिडियावर रोज नवनवीन घरगुती उपाय आणि हॅक्स व्हायरल होत असतात. सध्या असाच एक उपाय ट्रेंडमध्ये आहे तो म्हणजे फ्रिजमध्ये १ रूपयाचं नाणं ठेवणे.
लोकं प्रवासाला निघण्यापूर्वी त्यांच्या फ्रिजमध्ये १ रूपयाचं नाण ठेवतात. तुम्हालाही हे वाचून आश्चर्य वाटलं असेल पण हे खरं आहे.
मात्र फ्रिजमध्ये नाणं ठेवल्याने नेमकं काय होते. अनेक लोक ही ट्रिक का करतात? हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
आपण जेव्हा बाहेर प्रवासाला जातो तेव्हा घर बंद ठेवतो अशावेळी वीज गेली, फ्रिज बंद पडले तर अन्न खराब होऊ शकते. परत आल्यावर ते अन्न खाणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
फ्रिजमधील अन्न खराब झाले आहे की नाही हे तपासण्यासाठी १ रूपयाच्या नाण्याची ट्रिक करतात. ही पद्धत खरं तर एका साध्या विज्ञानावर आधारित आहे.
एक कप घ्या त्यात पाणी भरा ते फ्रिजमध्ये ठेवा. पाणी गोठल्यानंतर त्यावर १ रूपयांचे नाण ठेवा.
प्रवासावरून आल्यानंतर तुम्ही पाहू शकता जर नाणं अजून वरच असेल तर समजून जा की वीज व्यवस्थित होती. फ्रिज चालू होता.
जर नाणं खाली बुडलेलं असेल तर वीज गेली असण्याची शक्यता असते. अशावेळी अन्न वितळून पु्न्ही गोठते.
तर नाण्याची जागा बदललेली असेल तर तापमानात मोठा बदल झालेला असू शकतो.