ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अवघ्या काही दिवसात म्हणजेच १८ ऑक्टोबर २०२५ पासून दिवाळी सणाला सुरूवात होणार आहे. दिवाळी हा सण प्रकाशाचा, मांगल्याचा आणि विजयाचा सण आहे. या दिवाळी जीवनातील अंधार दूर होऊन प्रकाश येतो.
दिवाळीला नवीन वस्त्र घालण्याची जुनी परंपरा आहे म्हणून दिवाळी या सणाला सर्वजण नवीन कपडे घेतात.
दिवाळी सणाच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून नवीन वस्त्र परिधान केले जाते. माता लक्ष्मीची पूजा केली जाते.
दिवाळी हा वाईटावर चांगल्याच्या विजयाचा उत्सव आहे. या दिवशी नवीन कपडे घालणे म्हणजे नकारात्मकता दूर होते.
दिवाळी सणाला नवीन कपडे खरेदी केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते, घरामध्ये सुख- शांती येते. दिवाळीत नवीन कपडे खरेदी केल्याने शुक्र ग्रह मजबूत होतो असे मानले जाते.
दिवाळीच्या दिवशी नवीन कपडे परिधान केल्याने सकारात्मकता येते कुटुंबात प्रेम वाढते. दिवसाची सुरूवात शुभ होते असे मानले जाते.
नवीन कपडे परिधान करणे हे नवीन सुरूवात करण्याचे प्रतीक आहे. यामुळे दिवाळीला नवीन वस्त्र परिधान करून जुन्या गोष्टी मागे सोडून नवीन सुरुवात केली जाते.