Sakshi Sunil Jadhav
चाणक्यांनी त्यांच्या चाणक्यनितीत अनेक मोलाचे सल्ले दिलेले आहेत. त्यामध्ये तुम्ही सुखी आनंदी जीवन जगू शकता.
आयुष्यात २ प्रकारचे लोक असतात. एक म्हणजे आजुबाजूला माणसाची गर्दी असेल तरी एकटे पडलेले आणि दुसरे म्हणजे एकट्यात आनंद साजरा करणारे.
जे लोक स्वतःची किंमत ओळखतात, त्यांना सतत इतरांच्या लक्षाची किंवा कौतुकाची गरज लागत नाही. ते स्वतःच्या कमतरता आणि गुण दोन्ही स्वीकारतात.
काहींना रिकामेपण जाणवत नाही. ते पुस्तक वाचन, नवीन कौशल्य शिकणं किंवा स्वतःची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी वेळ कसा वापरायचा याकडे लक्षकेंद्रीत करतात.
चाणक्यांच्या मते, जास्त अपेक्षा केल्यावर दुःख मिळतं. समजूतदार व्यक्ती प्रत्येकाकडून साथ मिळेलच अशी अपेक्षा ठेवत नाहीत.
चाणक्यांच्या मते हे लोक नाती जपण्याला महत्व देतात. पण स्वतःच्या आनंदासाठी पूर्णपणे इतरांवर अवलंबून राहत नाही. त्यामुळे कोणी साथ दिली नाही तरी ते खचत नाहीत.
शांत मन असलेल्या व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत स्वतःला सांभाळू शकतात. असे लोक वाद, तुलना आणि दिखाव्यापासून लांब राहतात.
चाणक्यांच्या मते, हे लोक समाज काय म्हणेल यापेक्षा स्वतःच्या समजुतीनुसार जीवन जगतात. त्यामुळे ते मानसिकदृष्ट्या जास्त मजबूत बनतात.