ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मेंदूच्या कोणत्याही भागात रक्तपुरवठा होत नाही. अशा स्थितित पॅरालिसिस होऊ शकतो.
पॅरालिसिसचा झटका कोणालाही येऊ शकतो. या आजारामागे अनेक महत्वाची कारणे असू शकतात. चला तर जाणून घेऊया.
बी १२ च्या कमतरतेमुळे शरीरातील नसा आणि स्नायू कमकुवत होतात. यामुळे शरीरातील संतुलन बिघडते.
जसजसे वय वाढते तसतसे रक्तवाहिन्या कडक होतात. आणि त्याच चरबी जमा होण्यास सुरुवात होते. यामुळे पॅरालिसिसचा धोका वाढतो.
ब्लड प्रेशर किंवा हाय ब्लड प्रेशरमुळे ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो. आणि मेंदूतील रक्तवाहिन्या फुटतात. त्यामुळे पॅरालिसिस होण्याची शक्यता वाढते.
रक्तातील चरबीचे प्रमाण वाढल्यास याला हायपरकोलेस्ट्रोलेमिया असे म्हणतात. यामध्ये रक्तात चरबीचे प्रमाण वाढते.
तंबाखू , सिगारेट,दारु आणि गुटख्याच्या अतिसेवनाने पॅरालिसिस होण्याची शक्यता असते.
पाठीच्या कण्याला दुखापत, स्ट्रोक, मल्टिपल स्क्लेरोसिस, सेरेब्रल पाल्सी आणि पोलिओ यामुळे देखील पॅरालिसिस होऊ शकतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.