Manasvi Choudhary
हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे. श्रावण महिना हा अत्यंत पवित्र आणि धार्मिक महिना मानला जातो.
ज्योतिषशास्त्रानुसार, श्रावण महिना हा अत्यंत शुभ असतो. या महिन्यात देव-देवीतांची पूजा केली जाते. भक्ती केली जाते.
मात्र असे असले तरी काही ठिकाणी श्रावण महिन्यात कोणतेही शुभ कार्ये करत नाही. या महिन्यात लग्न करू नये असं देखील मानले जाते.
श्रावण महिना हा पूर्णपणे भक्ती, साधना, व्रत आणि उपवासासाठी समर्पित आहे. या महिन्यात लोक आपले मन आध्यात्मिक गोष्टींकडे आणि देवाच्या आराधनेकडे केंद्रित करतात.
आषाढ महिन्यातील देवशयनी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो. चातुर्मासाच्या काळात भगवान विष्णु चार महिन्यांसाठी योगनिद्रेत जातात.
लग्न या शुभ कार्यात श्री विष्णूंच्या मंत्राचे पठण केले जाते. मात्र श्रावणात श्री विष्णून योग निद्रेत असल्यामुळे शुभ कार्याच्या ठिकाणी उपस्थित राहत नाही. भगवान विष्णूच्या अनुपस्थितीत कोणतेही कार्य केले जात नाही.
श्रावणात, लग्नकार्यासोबत मुंडन, गृहप्रवेश , नामकरण ही कार्य देखील करत नाही.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.