ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
रात्री झोप न येणे, ज्याला निद्रानाश असेही म्हणतात, हे अनेक आजारांचे लक्षण असू शकते.
डिप्रेशन, चिंता, ताण आणि पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (PTSD) यासारख्या मानसिक आरोग्याच्या आजारांमुळे झोप न येण्याची समस्या होऊ शकते.
डायबिटीज,अस्थमा, थायरॉईड, हृदयरोग, अॅसिड रिफ्लक्स, आणि पार्किन्सन रोग यामुळे झोपे न येण्याची समस्या उद्भवू शकते.
काही औषधे, जसे की बीपी औषधे, अँटीडिप्रेसेंट्स आणि काही सर्दी आणि खोकल्याची औषधांमुळे झोप न येण्याची समस्या होऊ शकते.
दिवसा कॅफिन आणि रात्री अल्कोहोल घेतल्याने झोपेत व्यत्यय येऊ शकतो.
स्लीप एपनिया आणि रेस्टलेस लेग सिंड्रोम सारख्या झोपेच्या विकारांमुळे देखील निद्रानाशचा त्रास होऊ शकतो.
जर तुम्हाला झोपेचा त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे.