Manasvi Choudhary
महाराष्ट्रातील नागपूर हे शहर संत्र्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. पण या शहराला ही ओळख का मिळाली असेल असा प्रश्न तुम्हालाही नक्कीच पडला असेल.
नागपूर शहराला 'संत्र्याचे शहर' का म्हणतात? ते थोडक्यात जाणून घ्या.
नागपूर हे संत्र्याचे उत्पादक आणि वितरक व्यापारी केंद्र मानले जाते.
नागपूरच्या आजूबाजचा विदर्भ भाग हा संत्र्याच्या लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. नागपूर परिसरातील काळीमाती आणि हवामान संत्र्याच्या लागवडीसाठी पूरक मानले जाते.
नागपूरचे उष्ण हवामान आणि हिवाळ्यातील कोरडी हवा संत्र्यांच्या वाढीसाठी आणि फळाला नैसर्गिक रंग येण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.
नागपूरची संत्री लवकर खराब होत नाही म्हणून त्यांना देशभर मागणी आहे. नागपूर येथे संत्र्यांचे मोठे व्यापारी केंद्र आहे. नागपूरच्या बाजारपेठांमधून ही संत्री भारतातील सर्वच शहरे आणि विभांगामध्ये पाठवली जातात.
नागपूरची संत्री केवळ देशातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. युरोप, आखाती देश आणि आशियातील अनेक देशांत निर्यात केली जातात.