ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
डास आपल्याला प्रचंड त्रास देतात. खासकरून रात्रीच्या वेळी डास जास्त त्रासदायक ठरतात.
रात्रीच्या वेळी डास चावला तर झोपमोड होते.
मात्र तुम्ही कधी विचार केलाय का की डास रात्रीच कानाकडे का आवाज करतात आणि चावतात?
डासांचा रात्रीच कानाजवळ आवाज करण्यामागे काही वैज्ञानिक कारणे आहेत.
हे फक्त आपल्याला त्रास देण्यासाठी नसते, तर त्यांच्या जैविक प्रक्रियेचा तो एक भाग आहे.
आपण श्वास घेताना कार्बन डायऑक्साइड वायू बाहेर टाकतो. डास, विशेषतः मादी डास, कार्बन डायऑक्साइडला ५० मीटर दूरूनही शोधू शकतात.
डास शरीराच्या उष्णतेकडे आकर्षित होतात. त्यामुळे रात्री झोपल्यानंतर रात्री डास जवळ येतात.
रात्रीच्या वेळी शांतता असल्याने डास आपल्या जवळ येतात आणि रक्त शोषतात.