ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वास्तुशास्त्र आणि फेंगशुई दोन्हीमध्ये मनी प्लांटला खूप शुभ मानले जाते. मनी प्लांटला पैशांच झाड असे म्हणतात कारण ते सकारात्मक ऊर्जा तसेच आर्थिक समृद्धीचे प्रतीक मानले जाते.
मनी प्लांट हे समृद्धीचे आणि संपत्ती प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की हे रोप घरात आर्थिक स्थिरता आणि पैसा राखण्यास मदत करते.
वास्तुनुसार, मनी प्लांट घरातली नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो आणि सकारात्मक ऊर्जा पसरवतो, ज्यामुळे मानसिक शांती आणि आनंद टिकून राहतो.
हे रोप घरात तणाव आणि संघर्ष कमी करते. पती-पत्नी किंवा कुटुंबातील इतर सदस्यांमधील चांगले संबंध राखण्यास मदत करते.
मनी प्लांट घरात लावल्याने घरात प्रेम आणि सहकार्याची भावना टिकून राहते.
वास्तुशास्त्रानुसार, मनी प्लांट उत्तर, ईशान्य किंवा पूर्व दिशेला लावणे शुभ मानले जाते. यामुळे कुटुंबातील सदस्यांना प्रगती आणि यश मिळते.
मनी प्लांटची हिरवीगार पाने समृद्धीचे आणि देवी लक्ष्मीच्या आगमनाचे प्रतीक मानली जातात.