Shruti Vilas Kadam
फोनवर बोलत किंवा इंटरनेट वापरत आपण नकळतपणे लिफ्टमधे प्रवेश करतो अचानक मोबाईलच नेटवर्क गायब होतं आणि आपण वैतागतो.
लिफ्टच्या बाहेर नेटवर्क असत आणि लिफ्टमध्ये गेल्यावर गायब कसं होतं? यामागे दडलेल हे वैज्ञानिक कारण तुम्हाला माहित आहे का?
तर होतं असं की...आपला मोबाईलच्या अदृश्य इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स ( रेडिओ लहरीद्वारे ) मोबाईल टॉवरशी जोडलेल्या असतात.
लिफ्ट पुर्णपणे जाड काँक्रिट, लोखंड आणि स्टीलच्या धातूपासून बनलेली असते. हे आवरण मोबाईलच्या त्या लहरींसाठी सर्वात मोठा धोका ठरतं.
विज्ञानाच्या भाषेत लिफ्ट एका फॅराडे केज सारखं काम करते. म्हणजे धातू किंवा जाळीपासून बनवलेला असा पिंजरा किंवा बंदिस्त भाग, जो बाहेरील विद्युत चुंबकीय लहरींना आणि विद्युत क्षेत्राला आत प्रवेश करण्यापासून रोखतो.
जेव्हा एखादी विद्युत चुंबकीय लहरी फॅराडे केजवर आदळतात, तेव्हा त्या पिंजऱ्याच्या पृष्ठभागावर पसरतात आणि एकमेकांना परावर्तीत करतात. यामुळे आतील भाग पूर्णपणे सुरक्षित आणि लहरीमुक्त राहतो.
धातूच्या जाड बंद भिंतीमुळे बाहेरील सिग्नल आत येऊ शकत नाही, आणि आतील सिग्नल बाहेर जाऊ शकत नाही. त्यामुळे मोबालचा टॉवरशी असलेला संपर्क तुटतो.
म्हणजेच काय तर लिफ्टमधील धातूच्या भिंती ह्या वेव्स थांबवतात आणि नेटवर्क गायब होते.
म्हणून काही इमारतींमध्ये wi- fi राऊटर किंवा मोबाईल सिग्नल बुस्टर बसवले जातात, त्याद्वारे इंटरनेट कॉलिंग करणे शक्य होते.