महिनाभर भात खाणं बंद केल्यास शरीरात कोणते बदल होतात?

Manasvi Choudhary

भात

आहारातला प्रमुख घटक म्हणजे भात. भाताशिवाय पोट भरल्यासारखे वाटत नाही. मात्र भात खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. यासाठी तुम्ही महिनाभर भात खाणं बंद केल्याने शरीरात कोणते बदल होतात ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Health Care

रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते

पांढरा भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स उच्च असतो यामुळे भात खाल्ल्याने रक्तातील साखर वेगाने वाढू शकतो. भात खाणे बंद केल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते, ज्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो

Blood Sugar Level

वजन कमी होऊ शकते

भात हा कर्बोदकांचा मुख्य स्रोत आहे. जेव्हा तुम्ही भात खाणं बंद करता, तेव्हा शरीरातील अतिरिक्त कॅलरींचे प्रमाण कमी होते. शरीरातला फॅट कमी होतो.

Weight Loss | pinterest

सूज कमी होते

अनेकांना भात खाल्यानंतर पोट फुगल्यासारखे वाटते. यामुळे तुम्ही भात खाणं बंद केले तर पोटाच्या समस्या कमी होण्यास मदत होते. पचनक्रिया सुधारते.

stomach bloating | google

ऊर्जेची पातळी अधिक स्थिर राहते

भात खाल्ल्यानंतर ग्लुकोजची पातळी वाढते आणि थोड्या वेळाने ती पुन्हा खाली येते, ज्यामुळे खूप आळस किंवा सुस्ती येते. भात बंद केल्यास तुमच्या शरीरात साखरेची पातळी स्थिर राहते, ज्यामुळे दिवसभर उर्जा येते.

Blood Sugar Level

पचनक्रिया सुधारते

पांढऱ्या भातात फायबरचे प्रमाण कमी असते. भाताऐवजी जर तुम्ही आहारात भाज्या, कडधान्ये किंवा ओट्सचा समावेश केला, तर फायबरचे प्रमाण वाढते. यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते

digestion symptoms | googl;e

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Canva

NEXT: पावसाळ्यात ओल्या केसांची काळजी कशी घ्यायची? 5 सोप्या टिप्स

येथे क्लिक करा...