Manasvi Choudhary
पावसाळ्यात हवेतील आर्द्रतेमुळे केसांचा पोत खराब होणे, केस गळणे किंवा कोंडा होणे अशा समस्या सामान्य आहेत. पावसाळ्यात केसांची योग्य पद्धतीने काळजी घेणे महत्वाचे आहे.
पावसात केस ओले झाले तर ते लवकर सुकवा. पावसाचे पाणी केसांत राहिल्याने केस कमकुवत होतात. जर केस भिजले, तर घरी आल्यावर लगेच साध्या पाण्याने केस स्वच्छ धुवा आणि टॉवेलने कोरडे करा.
पावसाळ्यात टाळूवर घाण आणि तेल लवकर जमा होते, त्यामुळे आठवड्यातून किमान २-३ वेळा सौम्य शॅम्पूने केस धुवा. जास्त केमिकल असलेला शॅम्पू टाळा.
ओले केस अत्यंत नाजूक असतात. केस ओले असताना विंचरल्यास ते अधिक तुटतात. केस पूर्णपणे सुकल्यानंतरच कंगव्याने विंचरा.
आर्द्रतेमुळे केस फ्रीझी होतात. केस धुतल्यानंतर चांगल्या दर्जाचे कंडिशनर वापरा किंवा घरगुती उपाय म्हणून तांदळाचा वापर करा.
बाहेर पडताना केस पावसाच्या पाण्यापासून वाचवण्यासाठी स्कार्फ किंवा छत्रीचा वापर करा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.