Manasvi Choudhary
पावसाळ्यात शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी गरम आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन केले जाते. गरमा गरम सूप आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
टोमॅटो सूप तर आपण नेहमीच पितो पण त्यात तुम्ही शेवग्याच्या शेंगा टाकल्यास चवदार आणि पौष्टिक बनते. टोमॅटो आणि शेवगा मिक्स करून तयार केलेले हे गरमागरम सूप तुम्ही घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने बनवू शकता.
सूप बनवण्यासाठी टोमॅटो, शेवग्याच्या शेंगा, कांदा, आलं, लसूण, जिरे, काळी मिरी पावडर, गूळ हे साहित्य घ्या.
टोमॅटो आणि शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर गॅसवर कुकरमध्ये टोमॅटो, शेवग्याच्या शेंगा, कांदा आणि लसूण उकडून घ्या.
त्यानंतर उकडलेल्या शेगांचा गर काढून घ्या. टोमॅटोची पेस्ट बनवा दोन्ही मिश्रण एकत्र करा.
या मिश्रणात चवीनुसार मीठ, काळी मिरी पावडर, जिरेपूड आणि चिमूटभर हळद टाकून सूप ५-७ मिनिटे उकळू द्या.
सूप चवदार होण्यासाठी त्यात गूळ- मीठ घालून मिक्स करा. अशापद्धतीने गरमा गरम सूप तयार होईल.