Manasvi Choudhary
वजन वाढल्यानंतर किंवा कमी झाल्यानंतर मांड्यावर स्ट्रेच मार्क्स येण्याची समस्या सामान्य आहे मात्र यामुळे त्वचेचे सौंदर्य बिघडते.
अनेक महिला व मुली यांना शॉर्ट कपडे परिधान करण्याचा संकोच वाटतो अशासाठी आज आम्ही काही सोपे उपाय सांगणार आहोत ते तुम्ही घरच्या घरी करून पाहा.
आर्गन तेलामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ई असते ज्यामुळे हे तेल लावल्याने स्ट्रेच मार्क्स कमी होण्यास मदत होते. आर्गन तेलने हलक्या हाताने मांड्यावर मालिश करा.
लिंबाच्या रसामध्ये तुम्ही साखर मिक्स करून हे मिश्रण तुम्ही मांड्यांना लावा म्हणजे त्वचेवरील स्ट्रेच मार्क्स कमी होण्यास मदत होते.
खोबरेल तेलामध्ये दाहशामक गुणधर्म असतात त्यामुळे कोमट तेलाने मांड्यांची खोबरेल तेलाने मालिश करा तुम्हाला फरक दिसेल.
बदामाच्या तेलामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई आणि ओमेगा -3 फॅटी अॅसिड असतात ज्यामुळे स्ट्रेच मार्क्स कमी होण्यास मदत होते.
गुलाबजल पाण्यात मिक्स करून हे मिश्रण देखील तुम्ही स्ट्रेच मार्क्स असलेल्या ठिकाणी लावू शकता.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.