Manasvi Choudhary
तुम्ही देखील कधी ना कधी लिफ्टने प्रवास केला असेल. तुम्हाला असा प्रश्न पडला आहे का? लिफ्टमध्ये आरसा का असतो.
अनेकांच्या मते, लिफ्टमध्ये चेहरा व्यवस्थित आहे की नाही हे पाहण्यासाठी असतो मात्र असे नाही.
क्लॉस्ट्रोफोबिया नावाच्या आजाराने पिडित लोकांसाठी हा आरसा लावलेला असतो.
क्लॉस्ट्रोफोबिया झालेल्या रूग्णांना छोट्या जागेत जाण्याचा किंवा उभा राहण्याची भिती वाटते.यामुळे त्यांचा श्वासोच्छवासाची गती वाढू शकतो यामुळे मोठा परिणाम होऊ शकतो.
अनेक लोकांना छोट्या आणि बंदिस्त जागेत गेल्यावर भीती वाटते किंवा श्वास गुदमरल्यासारखं वाटतं यामुळे लिफ्टमध्ये आरसा बसवण्यात आला.
आरशामुळे तुम्हाला तुमच्या मागे कोण उभे आहे किंवा लिफ्टमध्ये काय हालचाली सुरू आहेत, हे न वळता सहज दिसू शकते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.