Sakshi Sunil Jadhav
महाराष्ट्रात महिला लग्न झाल्यावर हिरव्या रंगाच्या बांगड्या परिधान करतात.
हिरवा चुडा हे महिल्याच्या लग्नातील दागिन्यांमधील सगळ्यात महत्वाचा असतो. काही ठिकाणी महिला लाल रंगाचा चुडा सुद्धा परिधान करतात.
मात्र महाराष्ट्रात महिला किंवा सुवासिनी हिरव्या रंगाच्या बांगड्याच का वापरतात? हे जाणून घेऊ.
हिरवा रंग हा देवीचे प्रतिक आणि सौभाग्याचं लेणं मानला जातो.
नवरीच्या श्रृंगारात हिरव्या रंगाच्या बांगड्यांचा समावेश आवर्जून केला जातो.
महिलांनी लग्नानंतर हिरव्या बांगड्या परिधान केल्याने त्यांच्या सौंदर्यात भर पडते.
बांगड्या घातल्यावर हाताच्या मनगटावर घर्षण होतं. त्याने रक्ताभिसरण वाढते.