Manasvi Choudhary
आज सर्वत्र व्हॅलेंटाईन डे मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
प्रेमी युगुलांचा दिवस व्हॅलेंटाईन डे. या दिवसाची सुरुवात रोमन सणाने झाली.
संत व्हॅलेंटाईन कोण होते, त्यांच्या नावावरून व्हॅलेंटाईन डेचे नाव कसे पडले. या खास दिवसाशी संबंधित इतिहास काय आहे जाणून घेऊ.
इ.स. २७० मध्ये सेंट व्हॅलेंटाईन होते. सेंट व्हॅलेंटाईनने प्रेमाला खूप प्रोत्साहन दिले. रोमचा राजा क्लॉडियस याचा प्रेमाला विरोध होता.
प्रेमामुळे सैनिकांचे लक्ष विचलित होते, असं रोमच्या राजाला वाटत होतं. त्यामुळे त्याचा प्रेमाला विरोध होता.
संत व्हॅलेंटाईन यांना हे अजिबात आवडले नाही आणि त्यांनी याविरोधात आवाज उठवला आणि राजाचा विरोध केला.
संत व्हॅलेंटाईननेही अनेकांचे विवाह लावून दिले. १४ फेब्रुवारी रोजी त्यांनी सामूहिक विवाहाचा कार्यक्रम आयोजित केला.
१४ फेब्रुवारी रोजी संत व्हॅलेंटाइनला फाशी देण्यात आली. तेव्हापासून संत व्हॅलेंटाईनच्या स्मरणार्थ १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे सण साजरा केला जातो.