Manasvi Choudhary
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे वारकरी जात आहेत. पंढरपूरातील विठ्ठलाचे मंदिर हे पवित्र प्रसिद्ध ठिकाण आहे.
अध्यात्मिक अश्या पवित्र ठिकाणी लाखो भाविक, विठुरायाचे भक्त वारी घेऊन निघाले आहेत.
विठुरायाची विठोबा, पांडुरंगा अशी विविध नावे आहेत मात्र तुम्हाला माहितीये का विठ्ठल हे नाव कसं पडलं?
अख्यायिकेनुसार, पुंडलिक हे आई- वडिलांची सेवा करण्यात मग्न होते.
पुंडलिकांचे आराध्य दैवत हे विठ्ठल होते. विठ्ठल पुंडलिकांच्या घरी आले होते त्यावेळी पुंडलिक आपल्या आई - वडिलांची सेवा करण्यात मग्न होते.
यावेळी विठ्ठलांनी त्यांना बाहेर बोलावले. त्यावेळी पुंडलिक म्हणाले की, मी आई वडिलांची सेवा होत नाही तोपर्यंत बाहेर येणार नाही असं म्हटलं होतं.
विठुरायांना भक्तांनी विटेवरती उभे राहण्याची आज्ञा दिली होती. विठुराय हे आपल्या भक्ताच्या आज्ञेनुसार कंबरेवर दोन्ही हात आणि पाय दुमडून विटांवर उभे आहेत.
यामुळेच विटेवर उभे असल्याने त्यांना विठ्ठल हे नाव पडलं असं म्हटलं जात आहे.