Manasvi Choudhary
महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे विठोबाचे मंदिर आहे.
पंढरपूरच्या आषाढी वारीला सुरूवात झाली असून असंख्य भाविक पंढरपूरला आषाढी वारीला भेट देत आहेत.
वारकरी संप्रदायाचे दैवत विठ्ठलाची अनेक नावे आहेत. विठुरायाचे कानडा हे देखील नाव आहे.
यावरून तुम्हाला विठुरायाला 'कानडा' का म्हणतात हे जाणून घेऊया.
पांडूरंगाचे कर्नाटकाशी असलेलं नातं या जुना इतिहास आहे. पंढरपूर येथील विठोबाच्या मंदिरातल्या सोळंखांबी मंडपातील एका तुळईवर संस्कृत आणि कन्नड लेखात पंडरगे असं कोरलं आहे.
पंडरगे हे पंढरपूरचे मूळ नाव असून ते कानडी भाषेतील आहे.
विठ्ठल हा कानडा आहे. श्रीज्ञानदेवांनी त्याला कानडा आणि कर्नाटकु अशी विश्लेषणे संबोधली.