Bharat Jadhav
हिंदू धर्मात अनेक झाडे आणि वनस्पतींना पूजनीय आणि पवित्र मानले जाते. तर वास्तुशास्त्रातही अनेक झाडे आणि वनस्पतींना भाग्यवान मानले जाते.
हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रात संध्याकाळनंतर झाडांना स्पर्श करणे किंवा त्यांची पाने तोडणे निषिद्ध आहे.
ही परंपरा शतकानुशतके चालत आली आहे. जी आजही अनेक लोक पाळतात. या श्रद्धेमागे काही धार्मिक कारणे आहेत आणि वैज्ञानिक कारणे आहेत.
धार्मिक कारणानुसार, हिंदू धर्मात झाडे आणि वृक्षांना मानव आणि प्राण्यांप्रमाणेच सजीव मानले जाते.
इतर सर्व सजीवांप्रमाणे झाडे आणि वृक्षदेखील सकाळी उठतात आणि संध्याकाळी विश्रांती घेत असतात.
ज्याप्रमाणे झोपलेल्या माणसाला विनाकारण त्रास देतो किंवा त्यांना उठवतो ते पाप समजले जाते. त्याचप्रमाणे वृक्षांची पाने आणि झाडांची फुले तोडणं पाप मानलं गेलंय.
झाडांवर पक्षी राहतात. रात्रीच्यावेळी तेही आराम करत असतात. रात्री पाने, फुले तोडली किंवा झाड हलवलं तर त्याची झोप मोड होत असते.
सायंकाळनंतर झाडांना स्पर्श करणे. झाडांची फुले आणि पाने तोडू नये, यामागेही वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही चुकीचे मानले जाते.
झाडे दिवसा ऑक्सिजन सोडतात आणि कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात. पण रात्रीच्या वेळी झाडे कार्बन डायऑक्साइड वातावरणात सोडतात.
येथे क्लिक करा