कुवेतला का म्हटलं जातं टायर्सचं कब्रस्तान?

Surabhi Jayashree Jagdish

टायर्सचे कब्रस्तान

कुवेतला टायर्सचे कब्रस्तान असंही म्हणतात. यामागे ठोस कारण आहे. याठिकाणी जगातील सर्वात मोठे टायर डंपिंग ग्राउंड आहे.

डंपिंग ग्राउंड

कुवेतमधील सुलेबिया शहरात टायर्सचे सर्वात मोठं डंपिंग ग्राउंड आहे. म्हणूनच याला जगातील सर्वात मोठं टायर कब्रस्तान म्हटलं जातं.

वापरलेले टायर

तो एवढा मोठा आहे आणि एवढ्या मोठ्या भागात कचरा आणि वापरलेले टायर पडलेले आहेत की ते अंतराळातूनही दिसू शकतात.

लाखो जुने टायर

हे टायर डंपिंग ग्राउंड अरबी द्वीपकल्पाच्या उत्तर-पूर्व कोपऱ्यावर आहे. दरवर्षी परदेशातून आणलेले लाखो जुने टायर याठिकाणी टाकले जातात.

42 दशलक्ष

एका जुन्या आकडेवारीनुसार, कुवेतच्या वाळूमध्ये 42 दशलक्षाहून अधिक टायर फेकले गेले आहेत. हे जुने टायर जळाल्याने या भागातील हवेवर वाईट परिणाम होऊन ती विषारी होतेय.

टायर रिसायकलिंग

कुवेतने काही वर्षांपूर्वी टायर रिसायकलिंगचे काम सुरू केले आहे. या डम्पिंग ग्राऊंडमध्ये नवीन शहर वसवण्याच्या योजनेवर काम सुरू आहे.

टायरचा पुनर्वापर

याठिकाणी पडलेले टायर सौदी सीमेजवळील अल-सलमी नावाच्या नवीन ठिकाणी नेले जात आहेत. या टायरचा पुनर्वापर केला जात आहे.

रात्रीच्या वेळेस ताजमहालमध्ये लाईट्स का लावत नाहीत? 'हे' आहे खरं कारण

tajmahal | saam tv
येथे क्लिक करा