Shreya Maskar
लिफ्टमध्ये आरसा लावणे हे आपल्या मानसिक आरोग्यासाठी महत्वाचे आहे.
अनेकांना लहान किंवा अरुंद जागेची भीती वाटते आणि त्यामुळे त्यांचा जीव गुदमरतो. ज्याला क्लॉस्ट्रोफोबिया असे म्हणतात.
लिफ्टही बंदिस्त असल्यामुळे हृदयाचे ठोके वाढून हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
लिफ्टमध्ये आरसा लावल्यामुळे लिफ्ट मोठी आणि मोकळी वाटते.
तसेच लिफ्टमध्ये आरसा लावल्यामुळे आपले लक्ष विचलित होते. तसेच आपण स्वतःला न्याहाळत राहतो.
स्वतःमध्ये गुंतून राहिल्यामुळे लिफ्टच्या उंचीची भीती वाटत नाही.
लिफ्टमध्ये आरसा लावल्यामुळे आपले चहूबाजूला लक्ष राहते.
लिफ्टमध्ये आरसा असल्यामुळे व्यक्तीला बंदिस्त जागेतही सुरक्षित वाटते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.