Dhanshri Shintre
भारतात अशी अनेक शहरे आहेत, ज्यांच्या नावाच्या शेवटी 'गढ' हा शब्द जोडलेला आढळतो, यामागे इतिहास आहे.
'गढ' या शब्दाने संपणारी अनेक शहरे भारतात आहेत, पण या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित आहे का?
अनेक शहरांची नावे 'गढ' ने संपतात, पण असे का होते याचा विचार अनेकांनी आजवर नक्कीच केला असेल.
तुम्हाला याचे कारण माहित नसेल, तर आज आम्ही या 'गढ' शब्दामागील रंजक कारण सांगणार आहोत.
मुघल आणि राजपूत कालखंडात अनेक किल्ले उभारले गेले, ज्यामुळे 'गढ' हा शब्द शहरांच्या नावांत आला.
राजांनी उभारलेले किल्ले हे त्यांच्या सामर्थ्याचे आणि सत्ता स्थापनेच्या प्रतीकात्मकतेचे महत्त्वाचे चिन्ह मानले जात होते.
प्रत्येक शासकाने आपल्या नावाशी किंवा धर्माशी 'गढ' जोडत शहरांना ओळख निर्माण करणारी नवी नावे दिली होती.
अलीगढ, रायगड, फतेहगड, बहादूरगड, रामगढ, चित्तोडगड अशी अनेक शहरे 'गढ' शब्दासह प्रसिद्ध आजही प्रसिद्ध आहेत.
'कोल' किल्ला जिंकल्यानंतर सूरजमलने त्याचे नाव रामगढ केले, तर नंतर नजफ खानने ते अलीगढ ठेवले.