Dhanshri Shintre
भारत हा विशाल देश असून, त्याचा इतिहास देखील समृद्ध आहे, जो अनेक शहरांमध्ये आणि गावांमध्ये आजही विविध स्वरूपात दिसून येतो.
अनेक शहरं आणि गावांच्या नावांमागेही ऐतिहासिक घटना, प्राचीन परंपरा किंवा विशिष्ट सांस्कृतिक संदर्भ दडलेले असतात.
भारतातील अनेक गावे आणि शहरे यांच्या नावाच्या शेवटी 'पूर' हा शब्द जोडलेला आढळतो, ज्यामागे ऐतिहासिक संदर्भ असतो.
उदयपूर, जयपूर, कोल्हापूर, नागपूर, सोलापूर, कानपूर, रामपूर यांसारख्या शहरांच्या नावांच्या शेवटी 'पूर' हा शब्द आढळतो, जो ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे.
या शहरांच्या नावांमध्ये 'पूर' शब्द का जोडला जातो? यामागचा नेमका अर्थ आणि इतिहास काय आहे, ते जाणून घ्या.
प्राचीन काळात राजे, महाराजे आणि सम्राटांनी स्वतःच्या नावासोबत शहरांची नावे जोडण्याची प्रथा सुरू केली होती.
उदाहरणार्थ, राजा जयसिंह यांनी जयपूर शहर वसवले, म्हणून त्यांच्या नावासोबत ‘पूर’ जोडून जयपूर असे नामकरण करण्यात आले.
‘पूर’ हा प्राचीन संस्कृत शब्द असून, ऋग्वेदात याचा उल्लेख आहे. याचा अर्थ शहर किंवा किल्ला असा आहे.
शहरांच्या नावाच्या शेवटी ‘पूर’ जोडले जात असे, ज्यामुळे त्या ठिकाणाला विशिष्ट ओळख मिळत असे.