Ankush Dhavre
ताजमहल हे जगातील सर्वात सुंदर आणि आकर्षक वास्तूंपैकी एक आहे.
हे जगातील ७ आश्चर्यांपैकी एक आहे.
ताजमहल मुघल बादशहा शाहजहानने आपली पत्नी मुमताज महलच्या आठवणीत बांधले होते.
पण तुम्हाला कदाचित माहीत नसेल, ताजमहालाच्या वरून विमान उडवण्यावर बंदी आहे.
याचं कारण खूप कमी लोकांना माहीत असेल.
सरकारने २००६ मध्ये ताजमहलला नो फ्लाइंग झोन म्हणून घोषित केले होते.
ताजमहलच्या आजुबाजूच्या ७ किमीच्या पट्ट्यात विमान उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
हा निर्णय दुर्घटना आणि इथे होणारी गर्दी पाहून घेण्यात आला आहे.