ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लॅपटॉप व संगणकातील कीबोर्डवर QWERTY लेआउट वापरला जातो, जो सर्वात सामान्य टायपिंग फॉरमॅट मानला जातो.
या लेआउटमध्ये अक्षरे सरळ क्रमाने नसून विशिष्ट पद्धतीने पुढे-मागे हलवून बसवलेली असतात.
कीबोर्डचे हे खास डिझाइन का बनवले गेले यामागचं कारण आम्ही तुम्हाला सोप्या भाषेत सांगणार आहोत.
१८६८ साली लॅथम शोल्स यांनी जगातील पहिल्या टायपरायटरचा शोध लावून टायपिंग जगात क्रांती घडवून आणली.
या टायपरायटरमध्ये सुरुवातीला ABC क्रमाने कीपॅड दिला होता, त्यामुळे टायपिंगचा वेग खूप जास्त वाढला होता.
टायपरायटरच्या बटनांमधील कमी अंतरामुळे टायपिंग वेगवान होत होतं, पण पिन एकमेकांत अडकण्याची समस्या निर्माण होत होती.
पिन अडकल्यामुळे टायपरायटरचा कीपॅड जाम होण्याची शक्यता वाढायची आणि त्यामुळे बटणांची खराबी देखील होई.
ही अडचण दूर करण्यासाठी शोल्सने १८७३ मध्ये टायपरायटरच्या कीपॅड डिझाइनमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला.
त्याने कीपॅड QWERTY लेआउटमध्ये बदलल्यामुळे टायपिंगचा वेग थोडा कमी झाला, पण पिन अडकण्याची समस्या दूर झाली.
म्हणूनच QWERTY लेआउट स्वीकारलं गेलं आणि आज आपण वापरत असलेल्या कीबोर्डमध्ये हेच स्वरूप प्रचलित आहे.