ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पौराणिक कथेनुसार, भगवान शिवने विष प्राशन केल्यानंतर शरीराचे तापमान थंड राहण्यासाठी चंद्राला डोक्यावर धारण केले .त्यामुळे हिंदू धर्मात चंद्राची पुजा केली जाते.
करवा चौथ आण पोर्णिमेच्या दिवशी महिला आपल्या पतीसाठी किंवा मुलांसाठी उपवास ठेवतात आणि चंद्राला पाहून उपवास सोडतात.
तसेच आपल्या देशात लहान मुलं चंद्राला मामा म्हणून संबोधतात.
पण तुम्ही कधी विचार केलायं का चंद्राला मामा का म्हणतात. चला तर जाणून घेऊया.
समुद्रमंथनदरम्यान, समुद्रातून अनेक तत्व बाहेर आले. यातून माता लक्ष्मी आणि चंद्र देखील बाहेर आले होते.
चंद्राला देवी लक्ष्मीचा धाकटा भाऊ मानले जाते. यामुळे देवी लक्ष्मीला आई आणि तिच्या भावाला म्हणजेच चंद्राला मामा बोलतात.
याचे दुसरे कारण म्हणजे चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. आणि भावाप्रमाणेच पृथ्वीचे रक्षण करतो.
तसेच आपण पृथ्वीला आई मानतो. चंद्र पृथ्वीच्या जवळ असल्याने आपण चंदा मामा म्हणतो.