Dhanshri Shintre
मुंबईसह राज्यातील काही भागांत गेल्या काही दिवसांपासून संततधार पावसाने हजेरी लावली आहे.
पहिल्या पावसाच्या निमित्ताने अनेकांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केले, पण पहिला पाऊस इतका खास का वाटतो?
पहिल्या पावसानंतर जमिनीतून उठणारा मातीचा दरवळ मनाला आनंद देणारा आणि वातावरणाला ताजेपणा देणारा असतो.
कडक उन्हाळ्यानंतर आलेला गारवा देणारा पाऊस शरीराला आराम आणि मनाला नवे उत्साह प्रदान करतो.
पहिल्या पावसासोबत अनेकांच्या प्रेमभऱ्या, बालपणातील किंवा कॉलेज जीवनातील खास आठवणी जिवंत होत असतात.
गाणी आणि चित्रपटांमध्ये पहिला पाऊस नेहमी प्रेम आणि रोमँसचे सुंदर प्रतीक म्हणून सादर केला जातो.
लहान मुलांसाठी चिखलात उड्या मारणे आणि कागदी होड्या सोडण्याची मजा ही पहिल्या पावसातील खास आठवण असते.
कवी आणि लेखकांसाठी पहिला पाऊस नेहमीच प्रेरणास्त्रोत ठरला असून त्यांच्या लेखनात प्रेमाचे सुंदर चित्रण झाले आहे.