ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लहानपणापासून तुम्ही नियमितपणे आकाशातून विमान उडताना पाहत असाल, ही एक सामान्य गोष्ट आहे.
आजही विमानाचा आवाज ऐकताच अनेक लोक आपोआप आकाशाकडे नजर टाकतात.
विमान जमिनीवरून उडताना पाहताना, तुम्ही कधी त्याच्या खालील भागाकडे लक्ष दिलं आहे का?
विमानाचा खालचा भाग नेहमी पांढऱ्या रंगाचा असतो, यामागे तापमान नियंत्रण आणि संरक्षणासाठी कारणे असतात.
पांढऱ्या रंगामुळे विमान सूर्याच्या ९९% किरणांना परावर्तित करून त्याचं तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते.
पांढऱ्या रंगामुळे विमान जमिनीवरून इतर रंगांच्या तुलनेत अधिक स्पष्ट आणि सहज दिसते.
पांढऱ्या रंगामुळे विमानावरील ओरखडे आणि डेंट नीट दिसतात, ज्यामुळे देखभाल आणि तपासणी सोपी होते.