ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आकाशात झेपावणारं विमान पाहिलं कि प्रश्न पडतो की इतकं मोठं विमान उडतं कसं?
विमानाच्या बाबतीत विमानाचं वजन हे उड्डाणासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट असते.
विमान हवेत उडण्यासाठी चार मुख्य शक्ती म्हणजे लिफ्ट, थ्रस्ट, ड्रॅग आणि वजन यांचा समतोल आवश्यक असतो.
हे विमानाच्या पंखांमुळे तयार होते. जेव्हा विमान पुढे सरकते, तेव्हा हवेमध्ये दाबाचा फरक निर्माण होतो. पंखांच्या वरच्या बाजूला कमी दाब आणि खाली जास्त दाब निर्माण होतो, त्यामुळे विमान वर उचलले जाते.
हे इंजिनमुळे तयार होते. जेट इंजिन किंवा प्रोपेलर इंजिन विमानाला पुढे ढकलते.
हवेमुळे निर्माण होणारा विरोध. विमानाला हवेतून पुढे जाणं कठीण करतं. डिझाइनने ते कमी केलं जातं.
विमानाचं स्वतःचं वजन आणि गुरुत्वाकर्षणामुळे खाली खेचणारी शक्ती.
विमान रनवेवर वेगाने धावतं. थ्रस्ट वाढवण्यात येतो.
जसा वेग वाढतो, तसतशी पंखांवर लिफ्टची शक्ती तयार होते.
पायलट विमानाचं समोरचा भाग थोडं वर करतो. याला रोटेशन म्हणतात.
लिफ्ट वजनापेक्षा जास्त झाल्यावर विमान हवेवर उठतं आणि टेकऑफ होतो.