Surabhi Jayashree Jagdish
लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे.
श्रावण महिना हा भगवान शंकराला अत्यंत प्रिय मानला जातो. या महिन्यात शिवभक्त विविध प्रकारे त्यांची उपासना करतात.
श्रावण महिना हा तपस्येचा आणि साधनेचा महिना मानला जातो. अनेक साधू, संत आणि योगी तपस्या करताना दाढी आणि केस वाढवतात. त्यामुळे दाढी न करणं हे सुखांचा त्याग करून आध्यात्मिक मार्गावर लक्ष केंद्रित करण्याचे प्रतीक मानले जाते.
श्रावणात शिवभक्त विशेषतः पवित्रता आणि शुद्धतेचे पालन करतात. दाढी केल्याने शरीरातून काही प्रमाणात ऊर्जा बाहेर पडते असे मानले जाते.
श्रावणात अनेक लोक कठोर व्रत आणि नियमांचं पालन करतात. दाढी न करणं हा या नियमांचाच एक भाग असू शकतो
श्रावण महिन्यात दाढी न करणे ही प्रामुख्याने एक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे.