Manasvi Choudhary
पाण्याला कोणताही रंग नसतो, मग समुद्राचे पाणी निळे का असते? असा प्रश्न अनेकांना आहे.
समुद्राचे पाणी निळे असण्यामागची नेमकी कोणती कारणे आहेत ती या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
सूर्याच्या प्रकाशात सात रंग असतात. जेव्हा सूर्यप्रकाश समुद्राच्या पाण्याच्या थरांवर पडतो, तेव्हा पाण्याचे रेणू प्रकाशकिरणांमधील तांबडा, नारंगी, पिवळा आणि हिरवा यांसारख्या लांब तरंग लांबीच्या रंगांना शोषून घेतात. मात्र, निळ्या रंगाची तरंग लांबी सर्वात लहान असते, त्यामुळे तो रंग शोषला जात नाही.
पाण्यातील निळा प्रकाश आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचतो, ज्यामुळे समुद्र आपल्याला निळा दिसतो.
जर तुम्ही एका ग्लासमध्ये समुद्राचे पाणी घेतले, तर ते पूर्णपणे पारदर्शक आणि रंगहीन दिसेल. कारण एका छोट्या ग्लासात पाण्याचा थर खूप पातळ असतो. परंतु, जेव्हा महासागरांमध्ये पाण्याचा अथांग साठा आणि शेकडो फूट खोली असते, तेव्हा पाण्याचे रेणू मिळून निळ्या रंगाचा प्रभाव वाढवतात.
समुद्राचा निळा रंग दिसण्यामागे आकाशाच्या रंगाचे परावर्तन हे देखील एक कारण मानले जाते. आकाशातील निळा रंग समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागावर परावर्तित होतो, ज्यामुळे समुद्राचा रंग अधिक ठळक आणि निळा दिसू शकतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.