Manasvi Choudhary
आजकाल डिजिटलायजेशनच्या माध्यमातून सर्वचजण ऑनलाईन बँकिंगद्वारे पैशाची देवाण-घेवाण करत आहेत.
काही वेळेस बँकमध्ये जाऊन व्यवहार करायचा असल्यास पैसे काढण्यासाठी आणि भरण्यासाठी चेक स्लिपचा वापर केला जातो.
चेक भरताना त्याच्याशी संबंधित अनेक नियम आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे.
चेकवर लिहत असताना योग्य काळजी घ्यावी. कारण अनेकदा चेकवर कसे लिहायचे याची माहिती नसल्यामुळे फसवणूक होते.
चेक ही पैसे काढण्याची आणि भरण्याची खूप जुनी पद्धत आहे.
चेक भरत असताना रक्कम लिहल्यानंतर शेवटी Only लिहले जाते.
चेकवर रकमेच्या पुढे Only न लिहल्यास रकमेपुढे पैसे वाढवून फसवणूक होऊ शकते.