ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रत्येकासाठी त्याच्या आईशिवाय मोठा या जगात कोणीच नसते.
म्हणून तर म्हटले जाते स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी.
प्रत्येक आईच्या सन्मानासाठी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी 'मदर्स डे' साजरा केला जातो.
या वर्षीही १२ मे रोजी मदर्स डे साजरा केला जाणार आहे.
असे म्हटले जाते की, अॅना जार्व्हिस या महिलेने सर्वप्रथम हा दिवस साजरा केला होता.
अमेरिकेत १९०८ मध्ये पहिला मदर्स डे साजरा करण्यात आला. त्यानंतर तिच्या मित्रांनी आणि तिने या दिवसाला राष्ट्रीय सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली.
त्यानंतर अमेरिकेत १९१४ मध्ये मे महिन्याचा दुसरा रविवार मातृदिन म्हणून साजरा करण्यास मंजुरी दिली.