Manasvi Choudhary
उन्हाळ्याच्या सीझनमध्ये आंबा या फळाला विशेष मागणी असते. केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात आंबा प्रसिद्ध आहे.
आंबा या फळांची चव गोड असल्याने लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण चवीचवीने खातात.
आंबा हा त्याच्या चव आणि लोकप्रियतेमुळे फळांचा राजा म्हणून ओळखला जातो. मात्र तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का? फळांचा राजा आंबा, मग फळांची राणी कोण?
फळांची राणी म्हणजे सफरचंद, सिताफळ, पेरू नाही तर मँगोस्टीन आहे. जगभरातील फळप्रेमी मँगोस्टीनला 'क्वीन ऑफ फ्रुट्स' म्हणून ओळखतात.
मँगोस्टीन हे फळ कसं आहे? या फळाचा रंग कोणता? वैशिष्ट्ये समजून घ्या.
मँगोस्टीन हे फळ बाहेरून गडद जांभळ्या रंगाचे असते त्याचा आतील गर पांढरा, मऊ आणि रसाळ असतो.
या फळांमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, पोटॅशियम, मॅग्नेशियम , कॉपर ही पोषक घटके असतात.
मँगोस्टीन फळाचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होण्यास मदत होते व ताणतणाव दूर करते.
आंबा फळांचा राजा तर चव आणि आरोग्यदायी गुणधर्मानुळे मँगोस्टीन हे फळ फळांची राणी म्हणून ओळखले जाते.