Manasvi Choudhary
लांब, मोठे केस असावे अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते यासाठी महिला व मुली अनेक उपाय करतात. मात्र अनेकदा बाजारातील केमिकलयुक्त उत्पादनांच्या केसांच्या वाढीवर परिणाम होतो. केसांची वाढ खुंटते.
यासाठी आज आम्ही तुम्हाला सोपा घरगुती उपाय सांगणार आहोत. घरच्या घरी तुम्ही सोप्या पद्धतीने उपाय करू शकता.
कांदा, कोरफड,मेथी आणि कढीपत्ता यापासून बनवलेले तेल तुमच्या केसांची वाढीसाठी उपयुक्त ठरेल.
तेल बनवण्यासाठी मेथीचे दाणे रात्री भिजत घाला. सकाळी भिजवलेल्या मेथीच्या दाण्याची पेस्ट करा.
या मिश्रणात तुम्ही कांद्याचा रस कोरफड जेल आणि कढीपत्त्याचे पाणी मिक्स करा.
सर्व एकत्र मिक्स केल्यानंतर एका स्प्रे च्या बाटलीमध्ये हे तेल भरून ठेवा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा तेल लावून केसांची हलक्या हाताने मालिश करा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.