Chanakya Niti: आपण मूर्ख आहोत असं नाटक करणं का गरजेचं? पाहा चाणक्यांनी काय सांगितलं?

Surabhi Jayashree Jagdish

आचार्य चाणक्य

कूटनीतिज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि महान विद्वान आचार्य चाणक्य यांच्या शिकवणी आजही महत्त्वाच्या आहेत. त्यांनी जीवनाच्या प्रत्येक पैलूचा सखोल अभ्यास करून मार्गदर्शन केलंय.

चाणक्यनीती

चाणक्यनीती सांगते की, कधी कधी मूर्ख असल्याचं भासवणं आवश्यक असते. असं वागणं परिस्थिती समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरतं. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेता येतो.

प्रत्येकावर विश्वास ठेऊ नका

चाणक्यनीतीनुसार प्रत्येकावर डोळेझाक करून विश्वास ठेवू नये. अशा विश्वासामुळे फसवणूक होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच विवेकाने वागणं आवश्यक आहे.

खरा बुद्धिमान कोण?

चाणक्य म्हणतात की, खरा बुद्धिमान तोच असतो जो आपली खरी क्षमता लपवून ठेवतो. आपल्या सामर्थ्याचे प्रदर्शन नेहमीच आवश्यक नसतं. योग्य वेळी ती क्षमता दाखवणं अधिक गरजेचं असतं.

खरी वृत्ती

अनेकदा समोरच्याला पूर्णपणे समजून घेण्यासाठी स्वतःला मूर्ख दाखवावं लागतं. यामुळे त्यांची खरी वृत्ती समजते. ही युक्ती बुद्धिमत्तेचा भाग मानली जाते.

लोकांचा हेतू ओळखा

इतरांचा खरा हेतू ओळखण्यासाठी कधी कधी स्वतःला काही समजत नाही असं दाखवणं गरजेचं असतं. यामुळे त्यांचे खरे विचार आणि उद्देश स्पष्ट होतात. ही पद्धत निरीक्षणशक्ती वाढवते.

लोकांचा खरा स्वभाव

जेव्हा लोक तुम्हाला स्वतःपेक्षा कमी मानतात तेव्हा ते आपला खरा स्वभाव दाखवतात. अशा वेळी त्यांचे वर्तन अधिक स्पष्ट होते. त्यामुळे त्यांची खरी ओळख पटते.

चाणक्यांचा सल्ला

चाणक्य सल्ला देतात की सर्वात विश्वासू व्यक्तीलाही आपली सर्व गुपितं सांगू नये. कारण गुपितं उघड झाल्यास त्याचा गैरफायदा होऊ शकतो.

Bhakri Tips: भाकरी भाजण्यासाठी कोणता तवा वापरावा? भाकऱ्या होतील अगदी मऊ आणि लुसलुशीत

rice bhakri recipe
येथे क्लिक करा