Surabhi Jayashree Jagdish
२७ ऑगस्टला गणेश चतुर्थीबरोबरच गणेश उत्सवाची सुरुवात झाली आहे.
बाप्पांची स्थापना केल्यानंतर गणपतीचे विसर्जन देखील केले जाते.
स्वप्नशास्त्रानुसार, भगवान गणेश स्वप्नात दिसणे अत्यंत शुभ मानले जाते. पण स्वप्नात गणपती विसर्जन दिसणे शुभ संकेत मानले जात नाही.
विसर्जनाचा अर्थ म्हणजे बाप्पांना निरोप देणं. त्यामुळे असे स्वप्न अशुभ मानले जाते.
विसर्जनाचे स्वप्न म्हणजे एखादी महत्त्वाची गोष्ट हातातून सुटणे किंवा विघ्न निर्माण होणे, असा संकेत असू शकतो.
मात्र काळ आणि भावनेनुसार विसर्जनाच्या स्वप्नाचा अर्थ वेगळा असतो.
अनेक लोक मानतात की, जसे विसर्जनानंतर बाप्पा पुढील वर्षी पुन्हा येतात. तसेच हे स्वप्न नवीन संधी आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक देखील असू शकते.